बोर bore - shelipalan

 Goat farming

बोर

bore male

                   आज आपण या लेखातून बोर जातीच्या शेळ्यांच्या जातीची माहिती घेऊ. बोर जात प्रामुख्याने मास
उत्पादनसाठी मोठ्या प्रमाणात जगभर पाळले जाते. बोर जातीची निर्मिती दक्षिण आफ्रिकेत १९०० च्या सुरुवातीस झाली. Bore goat बोर जातीची बकरी खूप लोकप्रिय आहे व भारतातील सर्वात महागड्या शेळी जातींपैकी एक आहे. बोर जातीच्या (selective breeding)निवडक प्रजनन कार्यक्रमामुळे, ते मास आणि दूध उत्पादनासाठी पाळले जाते. बोअर शेळी हे नाव आफ्रिकन बोअर या शब्दावरून आले आहे, त्याचा अर्थ पशुपालक.

Sheli palan

बोर जातीच्या शेळ्यांची गुणवैशिष्ट्ये.

1) ह्या जातीच्या शेळ्यामध्ये मास उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात असते.
2) कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती खूप जास्त आहे.
3) शेळ्यांचा प्रजनन दर जास्त असतो.
4) ह्या जातीच्या शेळ्या दीड वर्षात दोनदा पिल्लाला जन्म देतात. बोर शेळ्यांमध्ये 1 पिल्लू देण्याचा जन्मदर 20%, 2 पिल्लू देण्याचा जन्मदर 60%, 3 पिल्लू देण्याचा जन्मदर 20%आहे.
 5) शेळ्या प्रामुख्याने डोके तपकिरी रंगाच्या असतात आणि त्यांचे शरीर पांढरे असते. काही बोअर शेळ्या पूर्णपणे तपकिरी किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात. 
6) ह्या शेळ्या दिसायला सुंदर व रुबाबदार दिसते. तसेच शेळ्यांची उंची लहान असते आणि त्यांना खूप मोठी शिंगे असतात.
7)वैज्ञानिक अभ्यासानुसार, नर जातीचे वजन 70-130 किलो असते आणि  (मादी) शेळ्यांचे वजन 65-85 किलो असते, सरासरी वाढीचा दर 150 व 206 ग्रॅम प्रतिदिन आहे.

शेळीपालन
female bore goat
Female bore goat

     भारतात, ह्या शेळ्या मुख्यतः महाराष्ट्रात आढळतात. बोअर जातीच्या शेळ्यांचा वापर मुख्यतः देशी शेळ्यांसह क्रॉसब्रीडिंगसाठी केला जातो. बोअरचे क्रॉसब्रीडिंग मुख्यतः बोअर x सिरोही, बोअर x उस्मानाबादी आणि बोअर x जमनापरी शेळ्यांबरोबर केली जाते. देशी शेळ्यामध्ये पिल्लाची वजन वाढिसाठी bore बरोबर क्रॉस ब्रीडिंग केली जाते . शुद्ध जातीच्या bore शेळ्यांचा वापर प्रजननासाठी केला जातो आणि क्रोसब्रीडिंग जातीचा वापर cutting मार्केटसाठी केला जातो

 join of telegram 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने