कोंबड्यांच्या विविध जाती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये

 कुक्कुटपालन व्यवसाय हा मुख्यता अंडा उत्पादन आणि मास उत्पादनासाठी ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो तर आज आपण या लेखांमधून कुकुट पालना मधून अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रमुख व लोकप्रिय कोंबड्यांच्या विविध जातींबद्दल माहिती घेणार आहोत


कोंड्यांच्याब विविध जाती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये

वनराज


कुक्कुटपालन व्यवसाय

वनराज ही देशी कोंबडीची संकरित जात असून ती मुख्यतः हैदराबाद मध्ये आढळून येते. वनराज कोंबडीचे पालन मास व अंडी अशा दुहेरी उत्पन्नासाठी प्रामुख्याने केला जातो. या कोंबडीची अंडी आकाराने मोठी असून त्यांच रंग हा तपकिरी असतो. ह्या कोंबडीचा रंग हा बहुरंगी असून तुरा लाल असतो व पाय हे पिवळसर रंगाचे असतात. वनराज कोंबडी ची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते त्यामुळे ती जास्त काळ जीवन राहण्यास सक्षम असते. ही कोंबडी 180 दिवसांनी अंडे देण्यास सुरुवात करते व तसेच वनराज कोंबडी च्या पूर्ण वाढ झालेल्या पक्षाचे वजन हे नर असल्यास दोन ते तीन किलो तर मादी असल्यास दोन ते अडीच किलो असते वनराज कोंबडीची वार्षिक अंडी देण्याची क्षमता ही 150 ते 180 नग असते. पूर्ण वाढ झालेल्या पक्षांना 135 ग्रॅम प्रतिदिन खाद्य लागते


गिरीराज

गिरीराज

कोंबडी प्रामुख्याने बेंगलुरु येथे आढळून येते ह्या कोंबडीचे पालन मास आणि अंडी उत्पादनासाठी अशा दुहेरी हेतूने केला जातो. ही कोंबडी काटक असून  रोगप्रतिकारशक्ती चांगले असते ह्या कोंबडीला विविध रंगातील पंखे असतात तसेच ह्या कोंबडीचा तुरा हा लाल असतो व पाय हे पिवळसर असतात ही कोंबडी वयाच्या 160 दिवसानंतर अंडे देण्यास सुरुवात करते. गिरीराज  जातीच्या संपूर्ण वाढ झालेल्या नर पक्षाचे वजन हे तीन ते साडेतीन किलो असते व मादीचे वजन हे दोन ते तीन किलो असते. ही कोंबडी वार्षिक 150 ते 160 अंडी देऊ शकते तसेच ह्या कोंबडीच्या अंड्याचा रंग हा तपकिरी असतो कोंबडीची जगण्याची क्षमता जास्त असून तिच्या मासाची गुणवत्ता ही उत्तम असते


कडकनाथ

कडकनाथ

     कडकनाथ ही कोंबडी मुख्यता मध्यप्रदेशांमध्ये माझा झाबुवा, धारा या आदिवासी भागांमध्ये आढळून येते. ह्या कोंबडीचा रंग हा काळा असून तिचा केसांचा रंग हा चंदेरी सोनेरी असतो ह्या कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती ही सर्व सर्वाधिक असते व या कोंबडीच्या मांसामध्ये मध्ये औषधी गुणधर्म असतात ह्या कोंबडीच्या मांस काळ्या  रंगाचे असते. मांस व अंडी उत्पादनासाठी या कोंबडीचे संगोपन विविध भागांमध्ये केले जाते. संपूर्ण वाढ झालेल्या कडकनाथ नर पक्षाचे वजन हे दोन ते साडेतीन किलो असून मादी पक्षीचे वजन हे दोन ते अडीच किलो असते या कोंबडीच्या वयात येण्याचा कालावधी हा 180 दिवस असून ही कोंबडी वर्षाकाठी 105-110 नग अंडी देते पूर्ण वाढ झालेल्या पक्षाला 130 ग्रॅम इतके खाद्य प्रतिदिन लागते ह्या कोंबडीच्या अंड्याचा रंग हा तपकिरी असून अंड्यांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आढळली जातात.


ग्रामप्रिया

ग्रामप्रिया


ही कोंबडी प्रामुख्याने हैदराबाद मध्ये आढळून येते तसेच ग्रामप्रिया कोंबडी ही गावरान कोंबडी सारखी विविध रंगांमध्ये आढळून येते व तिचा तुरा लाल असतो व पाय हे पिवळसर असतात तसेच ह्या कोंबडी मध्ये उत्तम अशी रोगप्रतिकारशक्ती असते व या कोंबडीचे अंडी ही तपकिरी रंगाची असून या कोंबडीचे वार्षिक अंडी उत्पादन देण्याची क्षमता ही 160 ते 180 नग इतकी असते ह्या कोंबडीचे संगोपन हे मांस व अंडी उत्पन्नासाठी केला जातो ती कोंबडी वयाच्या 170 व्या दिवसानंतर अंडे देण्यास सुरुवात करते पूर्ण वाढ झालेले पक्षाचे हे नर असल्यास अडीच ते तीन किलो तर मादी असल्यास दीड ते अडीच किलो इतके असते.


सातपुडा

सातपुडा


सातपुडा कोंबडीची जात मुख्यतः महाराष्ट्रातील बुलढाणा राज्यामध्ये आढळून येते तिची शारीरिक वैशिष्ट्ये आहेत की तिच्या पिसांचा रंग हा रंगीबिरंगी असून तिचा तुरा व पाय थोडेसे काळसर असतात तसेच ह्या कोंबडीची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असून कोंबडीचे मांस हे स्वादिष्ट असते ह्या पक्षाचे पालन हे मास व अंडी उत्पादनासाठी केला जातो असे सातपुडा कोंबडी ही वयाच्या 160 दिवसानंतर अंडे देण्यास सुरुवात करते पूर्ण वाढ झालेल्या सातपुडा पक्षाच्या नराचे वजन हे दोन ते अडीच किलो असून मादी पक्षीचे वजन हे एक ते दोन किलो असते. ह्या कोंबडीच्या अंड्याचा रंग तपकिरी असून शिव कोंबडी वर्षाकाठी 140 ते 150 नग अंडे उत्पादन देऊ शकते पूर्ण वाढ झालेल्या पक्षाला 140 ग्रॅम इतके खाद्य प्रतिदिन लागते.


व्हाईट लेगहॉन॔ 

व्हाईट लेगहॉन॔


ही कोंबडीची जात इटलीतील असून ती मुख्यतः अंडे उत्पन्नासाठी वापरली जाते. ही कोंबडी सर्वाधिक अंडी देणारी जात म्हणून जगभरात लोकप्रिय आहे ह्या  कोंबडी चा रंग पूर्ण पांढराशुभ्र असून तिच्या डोक्यावरील तुरा हा लाल रंगाचा असतो या कोंबडीचे पाय सुद्धा पांढऱ्या रंगाचे असतात ही कोंबडी ह्या जातींच्या कोंबड्यांचा वयात येण्याचा कालावधी हा 150 दिवस असतो पूर्णपणे वाढ झालेल्या पक्षाचे वजन नर असल्यास अडीच किलो ते तीन किलो आणि माझ्या कोंबडीचे वजन दीड ते दोन किलो असते ही कोंबडी सर्वाधिक म्हणजे 230 ते 310 नग वार्षिक अंडे उत्पादन देते


ऱ्होड आइलैंड रेड (RIR)

ऱ्होड आइलैंड रेड (RIR)


अमेरिकेमधील ऱ्होड आइलैंड बेट हे ह्या जातीचे मूळ स्थान आहे ही कोंबडी मास व अंडी उत्पादनासाठी जगभरात पाळली जातात त्या जातीच्या कोंबड्यांचा रंग पिवळसर तांबडा काळा मिशीत असतो शेतीचा रंग हा तपकिरी रंगाचा असतो ह्या कोंबडीची अंडी ही मोठी व वजनदार असतात ह्या कोंबडीच्या अंड्यातून सुदृढ पिल्लू जन्माला येते तसेच ह्या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी हा दीडशे दिवस असून पूर्ण वाढ झालेल्या नर पक्षाचे वजन 3.2 ते 3.6 किलो पर्यंत असते तर मादा पक्षाचे वजन हे अडीच ते तीन किलो असते.ऱ्होड आइलैंड रेड जातीच्या कोंबडीचे वार्षिक अंडा उत्पादन क्षमता ही 180 नग आहे कोंबड्यांच्या अंड्यांचा रंग हा तपकिरी असतो पूर्ण वाढ झालेल्या पक्षाला सरासरी 120 ते 130 ग्रॅम प्रतिदिन खाद्य लागते

   👉 शुसंवर्धन     
    👉 Follow on Facebook
    👉 join telegram  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने