गायींची दूध उत्पादन सुधरवण्याचे सर्वोत्तम मार्ग

 गायींची दूध उत्पादन सुधरवण्याचे सर्वोत्तम मार्ग

    गाई पासून उत्तम पद्धतीने दूध उत्पादन मिळवण्यासाठी अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. खालील  काही धोरणे दिले आहेत जी गाईचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी मदत करू शकतात


1) दर्जेदार खाद्य- दूध उत्पादनासाठी गाईनला संतुलित व  पौष्टिक आहार देणे अतिशय महत्त्वाची आहे गायांना ताजे गवत तसेच सायलेज यांसारखे उत्तम गुणवत्तेचा चारा मिळाला पाहिजे. हिरव्या चाऱ्या बरोबर गायींच्या आहारामध्ये सकस सुका चारा द्यायला हवा. याव्यतिरिक्त त्यांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करणारे सुव्यवस्थित पशुखाद्य त्यांना दिले पाहिजे. वयामानानुसार व गाईच्या शारीरिक परिस्थितीनुसार गाईला योग्य प्रमाणात आहार मिळणे अतिशय आवश्यक आहे उदाहरणार्थ( दुधावरील गाईंचा आहार वेगळा, भाकड गाईचा आहार वेगळा,गाभण गाईंचा आहार वेगळा, नुसत्याच प्रसूती झालेल्या गाईंचा आहार वेगळा इत्यादी)

cow farming


2) पाणी  पाणीपुरवठा व्यवस्थापन:- गायींना  नेहमी स्वच्छ आणि मुबलक पाणीसाठा असल्याची खात्री करा दूध  उत्पादनासाठी व गायांच्या आरोग्यासाठी पाणी आवश्यक घटक आहे.

पशुसंवर्धन


3) योग्य निवारा व्यवस्थापन- ऊन,वारा,पाऊस यांपासून बचाव करणारी निवास व्यवस्थापना असावी. गाईंचा गोठा बांधतांनी तो उंचीवर बांधावा त्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.गाईंना नेहमी आरामदायी व स्वच्छ वातावरणात ठेवावे.मुक्त गोठा असेल तर गायना फिरण्यासाठी आणि आरामात झोपण्यासाठी पुरेशी जागा असावी. बंदिस्त गोठ्यामध्ये दोन गायांना मधील अंतर योग्य प्रमाणात असावे व त्यांना बसण्यासाठी व झोपण्यासाठी पुरेशी जागा असावी. गाईंच्या गोठ्याची साफसफाई दररोज करावी तसेच आठवड्यातून तीन ते चार वेळा गाईंचा गोठा जंतुनाशकाचा वापर करुन पूर्णपणे साफ करून घ्यावा.

4) आरोग्य तपासणी व लसीकरण- गाईंच्या आरोग्याची नियमित तपासणी व लसीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे योग्य वेळेस लसीकरण केल्यास गाईंचे घातक आजारापासून बचाव होतो तसेच कोणत्याही आजारावर व संसर्गजन्य आजारावर पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार केल्यास इष्टतम दूध उत्पादन राखण्यास मदत होते तसेच गाईंच्या खुरांची वर्षातून दोन वेळेस कापणी होणे अतिशय आवश्यक आहे व तसेच गोचीड, पिसवा,माशा यापासून बचाव करण्यासाठी योग्य ते उपाय करणे आवश्यक आहे

5) दिनचर्या:  सातत्यपूर्ण व कार्यक्षम दूध उत्पादनासाठी नियमित दिनचर्या तयार करावी त्यामध्ये दूध काढायची वेळ, पाणी पाजायची वेळ, चारा टाकायची वेळ इत्यादी नेहमीची वेळ निश्चित करावी त्या अचानक बदलू नये गाईंचे नियमित अंतराने दूध काढावे तसेच दूध काढताना कासेतील संपूर्ण दूध काढावे  कास रिकामी व हलकी झाल्याची खात्री करावी.स्तनदाह व इतर कासे चे संक्रमण टाळण्यासाठी दूध काढण्याची साहित्य व उपकरणे योग्य स्वच्छ असणे आवश्यक आहे दूध काढण्याआधी व दूध काढून झाल्यावर कास साफ करणे आवश्यक आहे व दूध काढताना दूध काढणाऱ्या चा हात स्वच्छ असणे आवश्यक आहे.


गाय पालन


6) अनुवंशिक व्यवस्थापन- आपण आपल्या गाई वंशाची अनुवंशिकता सुधारून आपल्या गोठ्यामध्ये जास्त दूध देणाऱ्या गाईंची निर्मिती करावी व दूध निर्मितीसाठी उपयुक्त गुण असलेल्या बैल किंवा वीर्य निवडण्यासाठी व्यावसायिक ब्रिडर किंवा अनुवंशिक तज्ञाचा सल्ला घ्यावा. गाईच्या गर्भपिशवीची तपासणी योग्य वेळेस करावी व गाई माजा वर आल्यावर गाईचा माज ओळखून योग्य त्या कालावधीमध्ये ती पशुवैद्यकांकडून भरून घ्यावी. या काळामध्ये गाई तणावमुक्त राहिली याचि  काळजी घ्यावी.


दुध व्यवसाय


7) देखरेख आणि रेकॉर्ड कीपिंग- गोठ्यातील प्रत्येक गाईचे रेकॉर्ड व तसेच  तिच्या दूध उत्पादन डेटा चा मागवा ठेवा. हे तुम्हाला कोणतेही बदल किंवा समस्या लवकर ओळखण्यास आणि त्याची निराकरण करून त्याच्यावर योग्य उपाय करण्यास उपयुक्त ठरते लक्षात ठेवा दूध व्यवसाय करताना पशुवैद्यक किंवा दूधव्यवसाय तज्ञाशी सल्लामसलत करणे अतिशय महत्त्वाचे आहे जे तुमच्या विशिष्ट शेती परिस्थिती किंवा गायीच्या जातीनुसार विशिष्ट सल्ला देऊ शकतात. learn more


   👉 शुसंवर्धन     
    👉 Follow on Facebook
    👉 join telegram  


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने