सेंद्रिय शेती काळाची गरज (Organic farming)

       आज आपण या लेखामधून सेंद्रिय शेती बद्दल माहिती घेणार आहोत तर आपण जाणून घेऊया सेंद्रिय शेती म्हणजे काय? 

       सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाशी मिळून घेऊन केलेली शेती. सेंद्रिय शेतीमध्ये आपण रासायनिक खते, कीटकनाशके,टॉनिक वापर न करता आपण सेंद्रिय खत जसे की शेणखत,कोंबडी खत,गांडूळ खत,कंपोस्ट खत, जीवामृत अशा सेंद्रिय पदार्थांचा वापर करून केली जाणारी शेती होय.

       पिकांची  उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आजच्या काळामध्ये सर्रास रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पण त्यामुळे काही काळ पिकांची उत्पादन क्षमता वाढते परंतु काही वर्षांनंतर त्याचे खूप शारीरिक आणि आर्थिक दुष्परिणाम आपणास पाहायला मिळतात. रासायनिक खतांचा उपयोग करून केलेल्या शेतीचे उत्पादन वर्षानुवर्ष कमी होत जाते व रासायनिक खतांचा खर्च वाढत जातो या उलट सेंद्रिय शेती पद्धतीने केलेल्या शेतीतील उत्पन्न हळूहळू वाढत जाऊन जमिनीची गुणवत्ता पण सुधारते. पूर्वीच्या काळामध्ये सेंद्रिय शेती केली जायची ज्यामुळे माणसाचे आरोग्य निरोगी व त्याच बरोबर शेतीची गुणवत्ता सुद्धा टिकून राहण्यास मदत होत होती. रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शेतजमीन कालांतराने निरुपयोगी होते.

organic farming

Organic farming

         भारतामध्ये सेंद्रिय शेतीपासून मानवी आरोग्याला मिळाणारे फायदे व त्याचबरोबर शेतीमध्ये होणारे आर्थिक फायदे बघून दिवसेंदिवस सेंद्रिय शेती पद्धती लोकप्रिय होत चालली आहे.

                 भारतामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नॅशनल प्रोग्रॅम ऑफ ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP) या सरकारी संस्थे कडून प्रमाणपत्र दिले जाते तसेच या संस्थेकडून सेंद्रिय शेती नियंत्रित केली जाते. अधिकृत प्रमाणपत्र मिळालेल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल 'ऑरगॅनिक' म्हणून विकता येतो.

सेंद्रिय शेती करताना जास्त उत्पादन मिळवण्यासाठी खालील काही उपयुक्त पद्धतींचा वापर करावा

1) पीक नियोजन- 

  सेंद्रिय शेती करत असताना विविध पिकांची  लागवड करावी. पिकांच्या विविधतेमुळे नैसर्गिक कीट नियंत्रण करण्यास मदत मिळते व पीक निकामी होण्याचा धोका टळतो. तसेच शेती पासून योग्य तो आर्थिक नफा मिळतो.

2)खत व्यवस्थापन- 

   सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या खताचा वापर केला जातो त्यामध्ये शेणखत, लेंडीखत, गांडूळखत, विविध जैविक खते व कंपोस्ट खत यांसारख्या खतांचा वापर केला जातो. त्यामध्ये दीर्घकाळामध्ये शेत जमिनीचे आरोग्य व रचना सुधारण्यास मदत होते.

3) पिकांचे रोटेशन-

   सेंद्रिय शेती करत असताना एक सारखेच पीक शेतीतून न घेता आलटून पालटून पीक घेतल्यास शेतीची गुणवत्ता व अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते.

4) मागणी व पुरवठा- 

    सेंद्रिय शेती वाढीसाठी भारत सरकार विविध उपक्रम व योजना राबवत आहे.भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठेमध्ये योग्य तो भाव मिळत आहे. ज्यामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.तसेच रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च कमी होत आहे.

     सेंद्रिय शेतीमधील चालू घडामोडी आणि केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना व धोरणे तसेच सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा भारत कृषी आणि शेती कल्याण विकास मंडळ यांच्याशी संपर्क साधावा.

पशुसंवर्धन

    Beetal  (बिटल)

    Follow on Fackbook

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने