शेवगा शेती ची संपूर्ण माहिती

  शेवगा शेती 

    आज मी आपणास शेवगा शेती ची संपूर्ण माहिती देणार आहे शेवगा शेती साठी कोणत्या जमिनीची निवड करावी लागवडीचे अंतर किती असावे दिपक सिंचन पाणी नियोजन कसे करावे कोणते बियाणे निवडावे बीज प्रक्रिया कशी करावी लागवड कधी करावी व कशी करावी तसेच औषधाचे नियोजन व खत आणि एकरी उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. शेवग्याला विविध भाषांमध्ये मोरिंगा, ड्रम स्ट्रीक, सेहजन अशा विविध नावांनी ओळखले जाते.

             शेवग्याचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे  calcium संख्या पण खूप मोठा स्त्रोत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आहे.तसेच आर्थिक दृष्ट्या सुद्धा शेवगा पिकाचे वेगळेच महत्व आहे. आपल्याला जरी स्वातंत्र्य शेवगा शेती करणे शक्य नसले तरी आपण आपल्या शेतीच्या बांधावर शेवगा झाडांची लागवड करून वर्षाकाठी चांगला नफा मिळवू शकतो. शेवग्यामध्ये कॅल्शिअमचे आणि इतर जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेवगा झाडाचा वापर हिरवा चारा म्हणून जनावरांच्या चाऱ्या मध्ये सुद्धा केला जातो.

shevga sheti


शेवग्याच्या विविध वाणाची माहिती-

     शेवगा पिकाची लागवड करण्याआधी शेवग्याचे कोणते वाण वापरावे जेणेकरून आपल्याला अधिक उत्पादन मिळेल व नफा मिळेल त्यासाठी आपल्याला शेवगांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाची माहिती असणे गरजेचे आहे.

 जाफना शेवगा

   झोप नाही वाले एक स्थानिक आणि लोकल आहे याला देशी शेवगा म्हणून ओळखतात. ह्या वाणाच्या एका झाडापासून आपल्याला वरच्या काठी दीडशे ते दोनशे शेंगा मिळतात. या वाणाच्या शेंगा चवदार असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी असते. ह्या वाहनाच्या एखादे टाला एकच शेंग येते तसेच ह्या या वाणाच्या शेंगा वीस ते 30 सेंटीमीटर लांब असतात तसेच या वाहनाला वर्षातून एकदाच फुलोरा येतो ह्या वाहनापासून आपल्याला वर्षाला एप्रिल-मे-मार्च या महिन्यांमध्ये उत्पादन मिळते एका किलो मध्ये ह्या शेंगा वीस ते 25 बसतात.


पी.के.एम.1:-(pkm-1) शेवगा

          तामिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये या वाणाची उत्पत्ती करण्यात आली आहे. ह्या वाहनाच्या विविध अशा वैशिष्ट्यामुळे वाण शेवगा शेतीसाठी मोठ्या वापरले जाते. या रोपाच्या वाणाची लागवड केल्यावर सहा ते सात महिन्यामध्ये शेवगा शेंगा लागायला सुरुवात होते. शेंगांची लांबी ही 40 ते 45 सेंटिमीटर इतकी असते. तसेच ह्या वाहनाच्या झाडांची उंची ही चार ते पाच मीटर इतकी असते. शेवगा शेंग ह्या वजनदार व खाण्यासाठी चवदार असतात. एका शेंगेची वजन दीडशे ग्रॅम पर्यंत मिळू शकते. ह्या झाडांना वर्षातून दोन वेळा शेंगा लागतात तसेच एका झाडांची उत्पादन क्षमता ही 200 ते 400 शेंगा वार्षिक असते. लागवड केल्यानंतर आपल्याला सहा ते सात महिन्यानंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. एकदा लागवड केल्यानंतर हे वान आपल्याला चार ते पाच वर्ष उत्पादन देते


 पी.के.एम-2 (pkm-2) शेवगा

     हे वाण तामिळनाडू विद्यापीठाने विकसित केले असून सर्वाधिक उत्पादन देणारे व आर्थिक फायदा मिळवून देणारे वाण म्हणून ओळखले जाते. या वाहनापासून आपल्याला दोन हंगामात उत्पादन मिळते तसे जे योग्य असे नियोजन केले असता आपल्याला एका झाडापासून 200 ते 500 शेंगा असतात या वाणाच्या शेंगा रुचकर आणि स्वादिष्ट असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लागवड केल्यानंतर पाच ते सहा महिन्यांमध्ये पहिला फुलोरा येतो व त्यानंतर 65 दिवसानंतर आपल्याला शेंगा मिळायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला शेंगा या आठ ते सात महिन्यांमध्ये मिळण्यास सुरुवात होते. एका शेंगेची वजन अडीचशे ग्रॅम पेक्षा जास्त मिळू शकते .सर्व वाना मध्ये ह्या या वाणाच्या शेंगांची लांबी ही सर्वाधिक असते या शेंगांची लांबी ही 70 ते 80 सेंटीमीटर इतकी असते ह्या झाडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एका देठावर चार ते पाच शेंगा येतात. एकदा लागवड केल्यानंतर ही प्रजाती चार ते पाच वर्षे उत्पादन देते.


ओडिसी 3 शेवगा

      तामिळनाडूमधील त्या ओडामचत्रम क्षेत्रामध्ये आढळणारे एक स्थानिक वान आहे त्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. ह्या वानातील चांगल्या शेंगांची निवड करून या उत्पादनक्षमता व गुणवत्ता वाढवण्यात आलेली आहे. ओडीसा 3 हे वान वातावरण जर अनुकूल असेल तर वर्षभर उत्पादन देऊ शकते पण वर्षभर अनुकूल वातावरण मिळणे अशक्य आहे तरीसुद्धा हे वान वर्षातून दोन वेळेस आपल्याला चांगले उत्पादन मिळवून देते. एकदा लागवड केल्यानंतर आपल्याला आठ ते दहा वर्ष उत्पादन मिळते. शेंगेची लांबीही 1ते दीड फूट असते. एका झाडापासून आपल्याला वार्षिक 200 ते 400 शेंगा मिळतात. एका शेंगाचे वजन 100 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते

               शेवगा हे कमी खर्च कमी पाणी कमी असणारी पीक आहे शिवाय जास्त उत्पादन शेवगा लागवडीसाठी हलकी मुरमाड काळी पाणी निचरा होणारी असावी. तसेच अशा जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचू नये शेवगा हे पीक कमी पाण्याचे असल्याने हलकी व मध्यम जमीन निवडावी करून घ्यावी . लागवडीपूर्वी शेतीची चांगली महिनत करून घ्यावी.लागवडीचे अंतर हे दोन ओळीतील अंतर 10 फुटा पेक्षा कमी नसावी व दोन रोपांतील अंतर पाच फुटापेक्षा कमी नसावे. 


शेवगा शेतीमध्ये पाण्याचे नियोजन कसे करावे?

           आपण शेवगा शेती ला ठिबक सिंचन, सरी पद्धत व वाफा पद्धत याप्रकारे पाणी देऊ शकतो. शेवगा शेतीला प्रामुख्याने ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा जर ते शक्य नसेल तर आपण सरी पद्धत किंवा वासा पद्धतीने झाडांना पाणी देऊ शकतो. जमिनीचा व हवामानाचा अंदाज घेऊन आपण पाण्याची गरज पाहून पाण्याचे नियोजन करावे.पाणी देताना एकाच वेळी खूप पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाने पाणी देत असताना आपल्याला सुरवातीच्या काळामध्ये रोपाला डायरेक पाणी द्यायचे आहे एकदा रुपाची झाड झाल्यावर आपल्याला झाडाच्या खोडाला डायरेक्ट पाणी द्यायचे नसून ड्रीप दोन ते अडीच फूट खोडापासून लांबी द्यायचे आहे.


shevaga sheti
shevga sheti


शेवगा बी वर बीज प्रक्रिया कशी करावी?

               शेवगा बीज प्रक्रिया करण्याआधी आपल्याला शेवग्याच्या बिया मधील चांगल्या बिया बाजूला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवग्याच्या बिया आपल्याला आठ ते बारा तास अंबड ताकामध्ये भिजवत ठेवायच्या आहेत आणि त्या बाहेर काढून पेपर वर सावलीमध्ये अर्धा ते एक तास तसेच ठेवून त्यानंतर त्याची आपल्याला लागवड करायचे आहे ही झाली सेंद्रिय पद्धत तर आता आपण रासायनिक पद्धत बघणार आहोत शेवग्याच्या बिया हा आपल्याला बारा ते पंधरा तास साध्या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर त्या बाहेर घेऊन त्याला बाविस्टीन पावडर लावून घ्यायची आहे जेणेकरून बियांना बुरशी व रोग लागणार नाही आणि रोपांची मर की कमी होईल.


शेवगा शेतीमध्ये सेंद्रिय खतांचे आणि रासायनिक खतांचे नियोजन कसे करावे?  

     शेवगा लागवडीआधी शेतामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा आणि रोटर मारून घ्यावी. सेंद्रिय खतांमध्ये आपण कोंबडी खत, शेणखत, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत इत्यादींचा वापर करू शकतो. जमीन जर चांगल्या प्रतीची असेल तर रासायनिक खतांचा वापर करू नये त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा वर्षातून एकदा सेंद्रिय खत पूर्ण रानात टाकून घ्यावे तसेच शक्य असल्यास दोन वेळेस सेंद्रिय खत वापरावे. सेंद्रिय खतांचा वापर करणे शक्य नसल्यास आपण खालील रासायनिक खते देऊ शकतात. शेवगा झाडा लागवडीनंतर पहिल्या तीन महिन्यांनी 18:18:10 हे खत 100 ग्रॅम द्यावे. त्यानंतर पुन्हा तीन महिने 10: 26 :26 हे खत दीडशे ग्रॅम द्यावे याप्रमाणे प्रत्येक तीन महिने आपल्याला झाडांना खते द्यायची आहे झाडांचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे 50 ग्राम प्रमाणात रासायनिक खतांचे प्रमाण वाढवत आपल्याला न्यायचे आहे.


                               
                follow on Instagram 

              follow on Facebook




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने