(azola)अझोला शेती बद्दल संपूर्ण माहिती

  • अझोला शेती बद्दल  संपूर्ण माहिती:- 

            पशुपालन करत असताना खर्चा मधील 50-60 टक्के हा खर्च पशुखाद्यासाठी होतो पण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या  पशुखाद्याच्या किमती त्यामुळे मिळणारा नफा हा कमी होत चालला आहे अझोला चा वापर करून आपण पशुखाद्य त्याचे प्रमाण कमी करून अधिक नफा मिळू शकतो .जितका पूरक आणि सकस चार जनावरांना देऊ त्याच प्रमाणे आपल्याला त्याच्या पासून चांगले उत्पादन मिळू शकते आणि ती आरोग्य ही चांगले राखले जाऊ शकते.
azola

                आज आपण अझोला शेती बद्दल पूर्ण माहिती या लेखातून घेणार आहोत. अझोला हे पाण्यावर तरंगणारी शेवाळ (वनस्पती) आहे. अझोला चे मुख्य वैशिष्ट्य असे आहे की हवेतील नत्र स्वतःमध्ये साठवून ठेवते आणि आपण  हे साठवून ठेवलं नेत्र  पिकांसाठी किंवा जनावरांमध्ये आपण खुराक म्हणून वापरू शकतो. अजोला वनस्पती चा उपयोग जनावरांच्या दूध उत्पादन वाढीमध्ये होतोच तसेच त्याचबरोबर त्यांचे गुणवत्ता सुद्धा वाढते.

          दूध व्यवसाय बरोबर आपण शेळी पालन व कुक्कुटपालनामध्ये याचा वापर करू शकतो. शेळीपालनामध्ये अजोला चा वापर शेळ्यांच्या दूध वाढीसाठी तसेच वजन वाढीसाठी आपण करू शकतो कुक्कुटपालनामध्ये अजवला च्या वापरामुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता वाढते आणि वजन वाढ होते. अझोला चे वैशिष्ट्य असे की या वनस्पतीच्या पानाचा वरचा भाग हिरवा असतो आणि तळाचा भाग पांढरा असतो आणि वरचा भाग आणि खालच्या भागांमध्ये एक पोकळी असते त्यामध्ये नत्र साठवले जाते.अझोला मध्ये इतर वनस्पती पेक्षा अधिक प्रमाणामध्ये नत्राचे प्रमाण असते.

           जगभरामध्ये अझोला च्या जाती आहेत भारतामध्ये प्रामुख्याने अझोला pinnata  ही जात आढळली जाते जाते व तिची वाढ  आपल्या भारतीय वातावरणामध्ये चांगल्या प्रमाणात होती. ऍझोला हा खुराकाचा एक  सेंद्रिय स्रोत आहे कारण अझोला उत्पन्न उत्पादनासाठी कोणत्याही प्रकारचा रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जात नाही.

  • ऍझोला (azola) चे उत्पादन कसे घ्यावे?

           अझोला उत्पादन हे आपण आपल्या घराच्या परसबागेमध्ये किंवा शेतामधी खूप सोप्या पद्धतीने घेऊ शकतो. अझोला च्या उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 10 cm इतकी खोली एवढे जर त्याच प्रमाण सोडलं तर इतर त्याला काहीही आवश्यक नाही (खड्डा काढताना एक फूट खोल खड्डा घ्यावा)मग तुम्ही चौकोनी ही कुंड करू शकता आयताकृती करू शकता गोलाकार करू शकता तुमच्या कडे तशी जागा उपलब्ध असेल त्या प्रमाणात कमीत कमी खर्चात आणि जागेत अझोला उत्पादन घेऊ शकतात. तुम्ही अझोला चे उत्पादन हे जमिनीवर सुद्धा करू शकता किंवा जमिनीखाली सुद्धा करू शकता.

            जमिनीवर  जर करायचं झालं तर समजा तुमच्याकडे  तळजमीन असेल तर त्याला बाजूने तुम्ही चिरा किंवा आपल्याकडे असलेले विटा  किंवा लाकडाच्या फळ्या असतील तर त्या लावून तुम्ही चौकोनी किंवा आयताकृती कुंड तयार करून त्यामध्ये अजोला चे उत्पादन घेऊ शकतात तसेच जमिनीच्या खाली जर करायचं असेल तर तुम्हाला जेवढे जागेचे करायचा आहे  तेवढा जागेत दहा ते बारा सेंटीमीटर खड्डा करून तो खड्डा सपाट करायचा आहे. जमिनीवर किंवा जमिनीखाली ऍझोला ची उत्पादन घेत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की ज्या जागेवर आपण अझोला उत्पादन घेत आहोत ती जागेत कोणत्या बाजूला उतार नसावा की जेणेकरून पाणी एका बाजूला साचणार नाही. 

                खट्टा खोदल्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारची अंकुचीदार वस्तू नसावे जसे की दगड, काच इतर काही लोखंडाचे तुकडे वगैरे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये प्लास्टिक टाकायचे ते प्लास्टिक फाटता कामा नये आणि अझोला च्या खड्ड्यामध्ये खाली अणकुचीदार वस्तू नाही असे पाहिल्यानंतर जर तुमच्या घरा मध्ये काही जुन्या पोती किंवा कपडे असतील तर ते खाली टाकून द्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला प्लॅस्टिक टाकून द्यायचे आहे त्यासाठी आपण 150 मायक्रोनचे जर चांगल्या प्रतीचा प्लॅस्टिक वापरले तर थोडासा जास्त काळ azola बेडचे आयुष्य वाढू शकते. 

           प्लॅस्टिक अंथरतांना एक काळजी घ्यायची की त्याचे चारी बाजूनि ही बाहेर आले पाहिजेत आणि बाहेर आलेल्या बाजू पूर्णपणे मातीने किंवा वजनदार वस्तूने झाकून द्यायचे आहे . म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण अझोला बेड पाणी सोडणार आहोत त्यावेळी प्लास्टिक तान येऊ नये आणि ते गोळा होऊ नये. तसेच प्लॅस्टिक उंचवटा करून बाहेर आणायचे आहे जेणेकरून आतील पाणी बाहेर येऊ नये व बाहेरील पावसाचे पाणी आत जाऊ नये.

                 खड्ड्याच्या खालच्या भागांमध्ये चाळून घेतलेली मातीची एक सेंटीमीटर  परत ठाकून घेईची आहे. त्यासाठी तुम्ही वारुळाची माती सुद्धा वापरू शकतात. त्यानंतर एका बादलीमध्ये पाणी घेऊन चांगले कुजलेले 6 kg शेन टाकून तिची चांगले मिश्रण बनवून त्यात सिंगल सुपर फॉस्फेट हे चार ते आठ ग्रॅम टाकायचे आहे. सिंगल सुपर फॉस्फेट अझोला च्या वाढीसाठी वापरल जात. हे झालं नंतर हलक्‍या हाताने तुम्ही टाकलेल्या मातीवर सगळीकडे सारख्या प्रमाणात थोडं थोडं शिंपडून  घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ऍझोला बेड च्या एका बाजूनी पाणी सोडायचे आहे पाण्याचे  उंचीचे प्रमाण हे दहा सेंटीमीटर पर्यंत असावे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अझोला बीज सोडायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर ऍझोला चे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.

                   आज जनावरांना असलेल्या देण्याआधी आपल्याला ती साफ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. अजोला देताना तेचे प्रमाण पशुखाद्य मध्ये  हळूहळू वाढवत न्यायचे आहे. आपण एका जनावराला एक किलो ते दीड किलो ऍझोला दररोज आहारामध्ये देऊ शकतो.


शेतीविश्व

         follow on  facebook 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने