शेळीच्या पिल्लांच्या व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती.

 शेळीच्या पिल्लांच्या व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती :-

            शेळीपालन करताना असताना लहान पिल्लाचे योग्य संगोपन करून तेनाची जास्तीत जास्त वजन वाढत कमी काळात करून किंवा प्रजनन योग्य शेळी बनवून. अश्या बोकडांची आणि शेळ्यांची विक्री करून आपण शेळीपालना मध्ये नफा मिळतात असतो म्हणजेच शेळीपालनाचे अर्थकारण हे शेळ्यांच्या लहान पिल्लांवर अवलंबून असते त्यामुळेच शेळीच्य पिल्लांच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.


goat kids

शेळीच्या पिल्लांच्या व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती :-

1) नवजात कोकरू जन्मल्यावर त्याचीनाळ शरीरापासून 3-4 सें.मी. दुरुन कापून घ्यावी आणि ते स्वच्छ धाग्याने बांधून घ्यावी त्यानंतर त्यास टिंक्चर आयोडीन लावावे. हे औषध 2-3 दिवस रोज लावावे किंवा कोमट तेलामध्ये हळद टाकुन तेचे मिश्रण लावले.
2) पिल्लाचे जन्मानंतर पिल्लाच्या तोंडावरील व नाकावरील चिकट द्रावण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे.
3) त्यानंतर आपल्याला पिल्लाचे वजन द्यायचे आहेत व ती  नोंदवहीमध्ये लिहून घ्यायचे आहे जेणेकरून आपण 15 दिवसाने परत वजन घेऊ त्यावरून त्याची योग्य ती वजन वाढ होत आहे की नाही त्याचा अंदाज लावू शकतो.
4) शेळीने पिल्लाला जन्म दिल्यानंतर एक तासाच्या आत पिल्लाला त्याच्या आईचे दूध पाजायचे आहे. दूध पाजताना ते त्याला पोट भरून द्यायचे आहे आपल्या शेतकरी बांधवांचा समज आहे की शेळीच्या पिलांना जास्त दूध पाजू घातले तर त्याला जुलाब लागतात असे काही नसून शेळीच्या पहिल्या दुधामध्ये खूपशी पोषणमूल्ये असतात जर ते त्यांनी पोटभर पिले तर  लहान पिल्ले रोग प्रतिकार शक्ती वाढते व शेळीची लहान पिल्ले ससा रोगांना बळी पडत नाहीत त्यामध्ये मरीचे प्रमाण सुद्धा कमी होते.
5)नवजात पिलांना आणि त्याच्या आईला विण्याच्या शेडमध्ये 4-5 दिवस सोबत ठेवावे. नंतर पिलांना नवजात पिलांच्या कप्यात व आईस मुख्य कप्यात ठेवावे.
6)नवजात पिलांच्या कप्प्याचे व्यवस्थापन :- पिलांच्या कप्यात मउ तळासाठी तणिस अथवा गव्हाचे काड वापरावे. शक्य असेल तर मचानी वर पिलांना ठेवावे. त्यामुळे माती खाल्याने होणारे आजार पासुन बचाव करता येतो आणि तळ स्वच्छ राहाण्यास मदत होते.थंडी पासुन बचाव करण्यासाठी कप्याच्या वर 200 वॅटचे बल्ब लावावे.जास्त थंडी असल्यास लाकडी कोळसा जाळून किंवा शक्य असल्यास हिटर लावुन उष्णता निर्माण करावी. कप्याच्या जाळीस प्लास्टिक चे पडदे लावावे.पिलांना थंडी वाजणार नाही त्या साठी उपाय करावे.
7)पिलांना 30 दिवसांचे झाल्यावर जंतनाशक पाजावे. त्यानंतर नियमित स्वरूपात (2-3 महिन्याच्या अंतराने)जंतनाशक पाजावे.
8)पिलांना त्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या कप्यात ठेवावे. एकच कप्प्यांमध्ये खूप पिल्लांची दाटीवाटी करू नये.
9) पिलांना त्याच्या वजनाच्या 10-15℅ दुध पाजावे. पिलांना दूध कमी पडत असेल किंवा विताना आई मृत झाल्यास पिलांना दुसऱ्या शेळीचे दुध कडून बाटलीने पाजावे किंवा  मिल्क रिप्लेसर चा उपयोग करावा.
10)पिल्ले 6-7 दिवसांची झाल्यावर त्यास 1-2ml मिक्स ऑइल द्यावे आणि 8-10दिवसांच्या अंतराने ते 1-2mlने वाढवावे. त्याच प्रमाणे योग्य प्रमाणात multivitamin आणि calcium द्यावे.
11) पिल्ले 18-20 दिवसांची झाल्यावर स्वच्छ पाणी द्यावे आणि ताजा लुसलुशीत हिरवा आणि सुखा चारा द्यावा.
12) हिरव्या चाऱ्यामध्ये साधे हत्तीगावत, ऊस, उसाची पाचट वापर न करता अधिक प्रोटीन असलेले हिरवा चारा चा वापर करावा जसे की मेथी घास, दशरथ घास, शेवरी, सुबाभूळ, हदगा, तुती इत्यादी हिरव्या चाऱ्याचा वापर आपण करू शकतो. जेणेकरून कमीत कमी काळामध्ये पिल्लांची चांगली वजन वाढते व पिल्ले  निरोगी राहण्यास मदत होते. चांगल्या प्रतीचा हिरवा चारा उपलब्ध नसल्यास चांगला खुराक द्यावा जेणेकरून पिल्लांची वजन योग्य प्रमाणात होईल.
13) लहान पिल्ले एका जागेवर बांधून ठेवता त्यांना खेळण्यासाठी मुबलक कशी जागा उपलब्ध करून द्यावी.
14)शेळीच्या पिल्लाला शेळीचे दुध पाजण्याआधी तिचे स्तन साफ करून घ्यावी जेणेकरून पिल्लाला इन्स्पेक्शन होणार नाही

    पशुसंवर्धन

    Beetal  (बिटल)

    Follow on fackbook


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने