शिरोही शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती

           आज आपण या लेखांमधून शिरोही शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही शेळी ही मुख्यता राजस्थान मधील शिरोही गावामध्ये आढळून येते त्यामुळे तिला शिरोही असे नाव पडले आहे. शिरोही बकरी ही मुख्यतः मास व दूध उत्पादनासाठी भारतामध्ये पाळली जाते. शिरोही शेळीच्या बोकडांच्या देखणेपणामुळे व मोठ्या आकारामुळे ईद मार्केट साठी शिरोही बकरी च्या बोकडांना खूप मागणी असते.


1.1 शिरोही शेळी ची शारीरिक रचना

1.2 शिरोही शेळी खरेदी करताना घ्यायची काळजी

1.3 शिरोही शेळीचे व्यवस्थापन

1.4 ईद मार्केट साठी शिरोही बोकडांचे पालन

1.5 शिरोही शेळी च्या शारीरिक क्षमता

 

shirohi goat


1.1  शिरोही शेळी ची शारीरिक रचना

  •  शिरोही बोकडाचे वजन अंदाजे 60 ते 65 किलो असते तर शिरोही मादी चे वजन हे 45 ते 50 किलोपर्यंत असते
  • ह्या शेळीच्या नराचे उंची सरासरी 35 इंच ते 40 इंच पर्यंत असते तर मादी ची उंची ही 30 इंच ते 36 इंचा पर्यंत असते.
  •  बकरी ही तपकिरी डब्बे, पूर्ण तपकिरी, शिरा,लोहा, कॉफी अश्या विविध रंगछटा मध्ये आढळून येते.
  • ह्या शेळी मध्ये काही शेळ्यांना शिंगे असतात तर काही शेळ्यांना शिंगे नसतात. ह्या शेळी चे शिंगे ही मध्यम आकाराची व मागे वाकलेली असतात.
  • शेळ्यांची डोळी ही काळे व तपकिरी कलरची आढळून येतात.

1.2   शिरोही शेळी खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी.

  •  शिरोही शेळी घेताना वरील दिलेल्या सर्व गुणवैशिष्ट्ये पाहून शेळी विकत घ्यावी.
  •  महाराष्ट्रातल्या वातावरणात सेट झालेल्या शिरोही बकरी विकत घेण्यास प्राधान्य द्यावे.
  •  शारीरिक व्यंग असलेली किंवा आजारी शेळी घेऊ नये.
  •  बकरी घेताना जास्त दूध असणारी शेळी घ्यावी जेणेकरून  पिल्लांना मुबलक प्रमाणात दूध मिळून त्यांना योग्य पोषण मिळावे.
  •  वयाने जास्त असलेल्या शेळ्या घेऊ नये.
  •  ह्या शेळीचे पालन करत असताना महाराष्ट्रामध्ये कटिंग साठी( कट्टू माली)आलेला माल खरेदी करू नये. कारण त्या बोकडांची वजन वाढ होत नाही व शेळ्यांमध्ये सुद्धा विविध आजार आढळून येतात.

1.3   शिरोही शेळी व्यवस्थापन

  • शिरोही शेळी ला दिवसातून पाच ते सहा किलो चारा लागतो तर यामध्ये 70 टक्के हा हिरवा चारा तर 30 टक्के सुका चारा दिला जातो.
  • हिरव्या चाऱ्यामध्ये अधिक प्रोटिन्स असलेला सकस चारा शेळीला दिल्यास शेळीची चांगली वाढ होते व  उत्पन्नही चांगले मिळते. हिरव्या चाऱ्यामध्ये आपण  मेथी घास, दशरथ घास ,शेवरी, हदगा, हत्ती गवत व इतर झाडपाला आपण देऊ शकतो.
  •  ह्या शेळ्यांना 24 तास स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था असावी.
  • पूर्णपणे बंदिस्त बकरीपालन आपण करत असाल तर प्रत्येक शेळीला दररोज 15 ते 20 ग्रॅम मिनरल पिक्चर द्यावे जेणेकरून शेळीमध्ये प्रजननाचे दोष आढळून येणार नाहीत आणि शेळीचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
  • शेळ्यांचे वेळेवर लसीकरण करणे खूप आवश्यक आहे तसेच शेळ्यांचे डीवॉर्मिंग प्रत्येक सहा महिन्यातून एकदा करण्यात यावे.
  • शेळ्यांना त्यांच्या वयानुसार व शारीरिक परिस्थिती नुसार वेगवेगळी कप्पे असावेत. जसे की लहान पिल्लांचा कप्पा, गाबन शेळ्यांचा कप्पा, नरचा कप्पा, गाबन नसलेल्या व पिल्ले असलेल्या शेळ्यांचा कप्पा अशी कप्प्यांची रचना करावी.

1.4   ईद मार्केट साठी शिरोही बोकडांचे पालन

  • शिरोही बोकडांच्या शारीरिक रचनेमुळे व त्यांच्या रंगांमधील  विविधतेमुळे शिरोही बोकडांना ईद मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. 
  • ईद साठी ह्या जातीतील नरांचे बोकड पालन करत असताना घ्यायची काळजी की ती दिसायला चांगले व रुबाबदार असावीत. विक्री वेळी त्यांनी कमीत कमी दोन दाते लावलेली असावी.
  • त्याना कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंग किंवा जखम झालेली नसावी व त्यांची शिंगे तुटलेली नसावीत. ईद साठी आपण शिरोहीचे खच्ची केलेले किंवा अंडू बोकडांचे पालन करू शकतो. 
  • ईद साठी बोकड पालन करत असताना योग्य तो आहार व स्वच्छ पाणी देणे खूप आवश्यक आहे.

1.5    शिरोही शेळीच्या शारीरिक क्षमता

  • संभाळ योग्य रीतीने केल्यास ही शेळी 1.5 वर्षं दोन वेळा वेत देते. शेळ्यांमध्ये 1 पिल्लू देण्याचे प्रमाण 40%, 2 पिल्लू देण्याचे प्रमाण50%, 3 पिल्लू देण्याचे प्रमाण 10%आहे.
  • योग्य आहार असल्यास ही शेळी दिवसाला एक लिटर ते दोन लिटर दूध देऊ शकते.
  • ही शेळी कोणत्याही वातावरणात आपल्याला जुळवून घेते ही शेळी जास्तीत जास्त 40+ उष्ण वातावरण तसेच 4 ते5 डिग्रीपर्यंत थंडी सहन करू शकते.

   पशुसंवर्धन


   शेतीविश्व

   Beetal  (बिटल)

  Follow on fackbook


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने