जमुनापारी शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती

       आज आपण जमुनापारी शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ह्या शेळीची जात उत्तर प्रदेश मधील गंगा, यमुना आणि चम्बल नद्यांच्या खोऱ्यांमध्ये  प्रामुख्याने आढळून येते. या जमनापारी शेळीपालन हे मुख्यतः दूध उत्पादनासाठी व ईद मार्केट साठी केली जाते. ईद मार्केटमध्ये जमुनापारी बोकडांचा ला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते.

jamunapari goat

  जमुनापारी शेळी बद्दल संपूर्ण माहिती :-

  • जमुनापारी शेळी ही जास्त दूध देणारी शेळी म्हणून ओळखले जाते. योग्य व्यवस्थापन असेल तर एक जमुनापारी शेळी सरासरी दिवसांमध्ये दोन ते तीन लिटर दूध देते तर दुधाचे फॅट तीन ते चार टक्के असते.
  • ह्या शेळीचा रंग हा पांढरा  असतो तर काही शेळ्यांच्या मानेवर व कानावर काळ्या व तांबड्या रंगाचे ठिपके असतात.
  • जमुनापारी शेळी ही भारतामध्ये आढळणाऱ्या दुसऱ्या जातींच्या शेळ्यांन पेक्षा उंचीने सर्वाधिक असते. पूर्णपणे विकसित जमुनापारी नाराची उंची 90 ते 100 सेंटीमीटर असते तर मादीची उंची 70 ते 80 सेंटीमीटर असते.
  • ह्या शेळीच्या मागील पायावर लांब केस असतात तर नर व मादीला दाढी आढळून येते. तर कानांची लांबी 10 ते 14 इंच असते.

  • ह्या शेळीच्या जन्मलेल्या पिल्लाचे वजन तीन ते चार किलो असते.
  • जमुनापारी च्या मादी चे वजन सरासरी हे 45 ते 60 किलोपर्यंत असते तर बोकडाचे वजन अंदाजे 60 ते 85 किलो असते.
  • ह्या शेळीचे पहिल्यांदा पिल्लू देण्याचे वय हे 15 ते 18 महिने असते.
  • ही शेळी वर्षातून एकदाच पिल्ले देती तसेच शेळ्यांमध्ये 1 पिल्लू देण्याचे प्रमाण 50%, 2 पिल्लू देण्याचे प्रमाण 40%, 3 पिल्लू देण्याचे प्रमाण 10%आहे.
  • ह्या शेळ्यांची शिंग आकाराने छोटी व माघील बाजूस वळलेली असतात.
  • ह्या शेळीमध्ये आपल्याला कोणत्याही वातावरणात जुळवून घेण्याची क्षमता असते ही शेळी 42 डिग्री प्लस उष्ण वातावरणात सुद्धा आपल्याला जुळुन घेते तसेच 5 ते 7 डिग्री थंड वातावरणात सुद्धा ही शेळी राहू शकते.
  • ह्या शेळीची आकारमान हे इतर शेळ्या पेक्षा अधिक असल्यामुळे हिचा आहार सुद्धा इतर शेळ्‍यां पेक्षा अधिक असतो तसेच या शेळीला दिवसाला पाच ते सहा किलो चारा लागतो. तर त्यामध्ये चार किलो हिरवा चारा तर दोन किलो पर्यंत सुक्‍या चाऱ्याची गरज असते.
  • हिरव्या चाऱ्यामध्ये जमुनापारी शेळी ला शेवरी, हादगा, मेथीघास, दशरथघास, सुपर नेपियर ग्रास तसेच इतर सुधारित नेपिअर गवताच्या जाती व झाडपाला यांसारखा चारा देऊ शकतो. सुक्या चाऱ्या मध्ये आपण हरभरा भुसा, गहू भुसा,तूर भुसा, सोयाबीन भुसा यासारख्या सुक्या चाऱ्याचा वापर करू शकतो.
  • जमुनापारी शेळी बोकडांचे आकारमान अधिक असते व (पांढरा रंग, अधिक उंची, रुबाबदारपणा) त्यामुळे ते दिसायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे  ईद मार्केटमध्ये जमुनापारी चा बोकडांना मोठ्या प्रमाणात मागणी असते व त्यांना चांगला भाव सुद्धा मिळतो.
  • ईद मार्केट साठी फक्त जमुनापारी च्या बोकडांची पालन करून व त्यांचे योग्य असे व्यवस्थापन करून आपण चांगला नफा मिळवू शकतो.
  • जमनापारी शेळी विकत घेतानी दुसऱ्या व तिसऱ्या वेतातील, दूध चांगले असलेली, शारीरिक अपंग नसलेली, निरोगी शेळी विकत घ्यावी.
  • शेळ्या विकत घेण्याआधी सहा महिने अगोदर हिरव्या चाऱ्याची लागवड करावी व सुका चाऱ्याची साठवणूक करून ठेवावी.  

    👉 शुसंवर्धन     
    👉 Follow on Facebook
    👉 join telegram  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने