शेळी पैदाशी बाबत माहिती आणि व्यवस्थापन

 शेळी पैदाशी बाबत माहिती आणि व्यवस्थापन :

     शेळीपालन व्यवसाय करत असताना आपल्याला शेळी च्या पैदाशी बाबत माहिती असते खूप आवश्यक आहे तसेच त्याचे व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे कारण शेळीपालन करत असताना आपला नफा हा शेळीच्या पिल्लावर अवलंबून असतो, शेळीचा माज ओळखता आला नाही तर आपले शेळीपालन अडचणीत येऊ शकते. शेळीचे दीड वर्षात दोन वेत म्हणजे दोन वेळा तिनी पिल्ले दिली तर ह्या व्यसायातून आपल्याला चांगला नफा मिळू शकतो.म्हणून आपण शेळीच्या पैदाशी बाबत माहिती आणि व्यवस्थापन कसे करावे या बाबत आपण आज ह्या लेखातून माहिती घेणार आहोत.


goat farming

goat farming


शेळीपालन

1) शेळी किमान 7 ते 10 महिन्यात पहिला माज दाखवतात, परंतु पहिल्या दोन माज रेतन न करता सोडून दावेत तिसऱ्या माजास रेतन करावे.


2) शेळी प्रथम गाभण राहाताना किमान वजन 25 ते 30 किलो च्या पुढे असावे.


3) गाभण काळ 145 ते 150 दिवस  असतो.


4) शेळीतील माजाचे चक्र दर 21 दिवसांनी येते .शेळी मधील स्त्रीबीज 24 ते 30 तासांत माज सुरु झाल्या नंतर होत असते ,या काळात मध्ये किमान दोन वेळा रेतन करून घ्यावे.


5) रेतन केल्यानंतर दोन पुढिल माजाची काळजीपूर्वक पाहाणी करणे, माज दिसून आला नाही तर गाभण असण्याची शक्यता असते.जर तुम्हाला शेळीची माज दिसून आला तर शेळी पुन्हा भरून घ्यावी.


6) गाभण शेळया साठी व्यवस्थापन वेगळे करणे आवश्यक असते.वेण्याच्या शेडमध्ये प्रत्येक शेळीसाठी एक कप्पा निर्जंतुक केलेला असावा .त्यात खाली गव्हाचे वा तनसाचे  आच्छदन असावे किंवा पोत्याचे आच्छादन असावे.


7) रेतन झालेली तारिख व इतर सर्व प्रजनन विषची नोंद ठेवावी.


8) नर व मादी जन्मचे प्रमाण 1:1 असते.


9) शेळीची नाडी 70 ते 75 प्रति मिनिटास असते.


10) श्वासोच्छ्वास 20 ते 25 प्रति मिनिटास असते.


11) शेळीच्या माजाची लक्षणे :- सतत आवाज करणे, शेपटी हलवणे, अस्वस्थ होणे ,खाधे खाने कमी करणे, योनि मार्गात चिकट स्राव दिसून येतो.


12) शेळी माजावर येत नसल्यास उपाययोजना करावी.आठ ते दहा दिवस मोड आलेली कडधान्य, मका  भरपुर प्रमाणात द्या. कप्यातील नर काढून टाका. आठ दिवसांनी परत सोडा. नराच्या उपस्थितीत शेळ्या लवकर माजावर येतात. 

          शेळीपालन मध्ये आपल्या शेळ्याला संतुलित आहार दिला तर आपल्या शेळ्या वेळे वर माजावर येतात तसेच शेळी लवकर गाभण राहते .गाभण शेळ्या मुख्य कळपा पासून दूर कराव्या जेणे करून दुसऱ्या शेळ्यांपासून त्यांनाच बचाव होईल. गाभण शेळ्याला शेवटच्या महिन्यात जास्तीचा खुराक द्यावा जेणे करून पिल्लाची वाढ योग्य होईल आणि शेळी वेल्या नंतर तेचे दूध पण वाढेल.

           जर आपणास ही माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेळीपालक मित्रानं पर्यंत share करा.
                                                                   join telegram

                   टीप:-कॉपी पेस्ट केल्यासत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने