शेळीपालन मध्ये अपयशी होण्याची कारणे

शेळीपालन :-

goat farming
Shelipalan mahiti

शेळीपालन मध्ये अपयशी होण्याची कारणे 

 1) यशोगाथेत सांगितले जाणाऱ्या लाखोंचे फसवे आकडे,या शेळीपालन यशोगाथा नामक फसव्या मार्केटीग प्रकाराला बळी पडणे. 

2) कोणताही शेळीपालनचा अनुभव किंव्हा शेळीपालन प्रशिक्षण नसताना,सुरुवातीलाच 10-15 लाख गुंतवणूक करून 100-150 शेळ्या विकत घेणे. 

3) शेळ्यांसाठी महागडा चारा विकत घेणे. 

4) शेळीपालन च्या सुरवातीलाच महागडे शेळीपालन शेड/ गोठे बांधणे. 

5) स्वतः लक्ष न घालता सगळे काम कामगारांवर सोपवणे. 

6) आपल्या वातावरणात तग धरणाऱ्या स्थानिक जाती न ठेवणे. 

7) आजार त्वरीत ओळखण्याचा अभाव, घरगुती उपचारांची माहीत नसणे.

 8) गोट्या मध्ये स्वच्छता नसणे. व्यवस्थापनात कमी पडणे.

 9) शेळीपालन चारा नियोजन नसणे.शेळ्या विकत घेण्या आधी 3-4 महिने चारा पिकांची लागवड न करता,शेळ्या विकत घेतल्यावर चारा पिकांची लागवड करणे. 

10) गोठ्यामध्ये सतत आजारी पडणाऱ्या, माजावर वेळेवर न येणाऱ्या,एक पिल्लु देणाऱ्या शेळ्या ठेवणे. 

11) लसीकरण न करणे किंवा ते वेळेवर न करणे. त्यामुळे मरतुकीचे प्रमाण वाढते आणि शेळीपालन व्यवसाय तोट्यात येणे. 

12) शेळ्या चोरीला जाने किंवा वाघ,बिबट्या सारख्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामूळे मोठ्या नुकसान होणे.

 13) आहार शास्त्र ची माहिती नसणे किंवा माहिती असून सुद्धा तेचा अवलंब नाही करणे. 

14) कमी किंमतीत मिळते आहे म्हणून खुरट्या, वय जास्त असलेल्या शेळ्यांची निवड करणे,दुधाला कमी असली शेळी निवडणे, खूप कमी वय असली पिल्ले आणून शेळीपालन करणे. 

15) फिरस्त शेळ्या विकत घेऊन अचानक त्या शेळ्याला बंदीस्त करणे. 

16) शेळी विकायचे कमी मार्केटिंग कौशल्य त्यामुळे विकायला तयार झालेला माल वेळेत विकला नाही जाणे. 

17) अनुवंश सुधाराचा अवलंब नाही करणे किंवा तेचि माहिती नसणे. 

18) शेळीपालनातून जलद जास्त नफा मिळवायचे स्वप्न पाहणे. 

19) शेळीपालन कडे एक व्यासाय म्हणून न बघणे. 

20) शेळीपालना मध्ये होणाऱ्या खर्चाची नोंद नाही ठेवणे.







टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने