सुपर नेपियर ग्रास(super Napier grass) माहिती

सुपर नेपियर ग्रास(super Napier grass) माहिती
         
 आपण पशुसंवर्धन करत असताना आपल्या जनावरांना पोषक आणि मुबलक चारा मिळणे खूप गरजेचे आहे .पण कमी होत जाणारे शेती क्षेत्र त्यामुळे पशूंना पोषक आणि मुबलक चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचे खूप अशे तोटे आपल्याला बघायला मिळतात जसे की दुधात कमी, वजन वाढ कमी होणे, पशु आजारांना लवकर बळी पडणे इत्यादी.आज आपण एक कश्या चाऱ्या बदल माहिती घेणार असतो जो चारा प्रत्येक पशुपालकाच्या शेतात असावा.

      सुपर नेपियर ग्रास(super Napier grass) 

     
super napier grass
कृषीकर्म ऍग्रो फार्म वरील सुपर नेपियर ग्रास

 सुपर नेपियर ग्रास  (pakchong1)& (pakchong2) हा चारा  थायलँड मध्ये विकसित केला गेला असून ह्या चाऱ्याला नेपियर चाऱ्याचा राजा बोले जाते. सुपर नेपियर ग्रास हा हत्ती गवतचा मोती बाजरी बरोबर संकरित करून बनवले गेले आहे. सुपर नेपियर ग्रास हा हत्ती गवताची सुधारित जात असून ती हत्ती गवतांन मध्ये सर्वात जास्त जलद गतीने वाढणारी आणि अधिक (crude protein) प्रोटीन-प्रथिने असलेली एक जात आहे.


सुपर नेपियर ग्रास(super Napier grass) माहिती इन मराठी

• जलद गतीने वाढ 15 फूट पेक्ष्या जास्त उंची फक्त 60-70 दिवसात होते.


• शेळीपालन मध्ये व गायीच्या दूध वाढीसाठी व fat आणि snf वाढीसाठी  उपयुक्त कसे 17-18% प्रोटीन असलेला हिरवा चारा म्हणून ह्या चाऱ्याचा वापर केला जातो.


• सुपर नेपियर ग्रासची लागवड केल्या नंतर 3-4 महिन्यात पहिल्या कापणी येते. पहिल्या कापणी नंतर 42-60 दिवसात पुढील कापण्या येतात. योग्य काळजी घेतल्यास वार्षीक 6-7 वेळा कापणी होतात.


• सुपर नेपियर ग्रासची लागवड करतानी खूप जवळ जवळ करू नये 2-2 फुटावर करावी जेणे करून गवताची योग्य वाढ होईल. एकरी लागवडी साठी सुमारे 8000-10000 कांडी लागते.


• आपल्याला सुमारे एका हेक्टर मधून दुसऱ्या हत्ती गवताच्या तुलनेत अधिक (450-500 टन/हेक्टर/वर्ष )उत्पादन मिळते. म्हणजे एकरी 180-200 tons वार्षिक उत्पादन मिळते.


• हे कूस नसलेला नेपियर ग्रास असून ह्या हत्ती गवताला पाने जास्त असतात तसेच तेचि कांडी मऊ असती.


• एकदा लागवड केल्यानंतर सुपर नेपियर ग्रास हे सुमारे 8 वर्ष चालते. जेनी करून प्रत्येक वेळी येणार चारा लागवडीचा खर्च कमी होतो.


• हे हत्ती गवत सकस,संतुलित, उत्तम तसेच 2rs/kg पेक्ष्या कमी खर्चत तयार होते.


• सुपर नेपियर ग्रास वापर आपण मुरघास बनवून तेचे साठवून करून ठेऊ शकतो.

       
super napier stem
2rs/stem
थायलंड मध्ये विकसित केलेले (pakchong1) सुपर नेपियर ग्रास आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील  कराड शहरात कृषीकर्म ऍग्रो फार्म वर विक्रीसाठी उपलब्ध. (2rs/कांडी) contact as:-8805194532 learn more..

     * सुपर नेपियर ग्रासची लागवड*

          भारताच्या सर्व भागामध्ये ह्या चाऱ्याची लागवड करता येते. तसेच आपण कोणत्याही प्रकारच्या हवामानातही सुपर नेपियरची लागवड करू शकतो. सुपर नेपियर ग्रास ची लागवड आपण वर्षं भर कोणत्या ही ऋतू मधी करू शकतो पण हिवाळ्यात लागवड करणे टाळावे करण हिवाळ्यात थंडी मुळे वाढीस वेळ लागतो.लागवड ही आपण सर्व प्रकारच्या मातीमध्ये करू शकतो. मातीच्या गुणवतेवर त्या मधील प्रथिनांचे प्रमाण कमी जास्त होत असते पण त्याच्या उत्पादनावर तेच जास्त प्रभाव होत नाही. सुपर नेपियरची लागवड करण्या आधी एकरी शेतात 2-3 टन  सेंद्रिय खते टाकून घ्यावी. हत्ती गवताची कापणी झाल्यावर त्याला खते घ्यावीत.

      join telegram 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने